WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

स्वा.सावरकर म्हणजे धगधगते यज्ञ कुंड संदीप बोरकर यांचे प्रतिपादन

Image

सागर मुने, वणी:-

आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात स्वतः सह आपल्या पूर्ण कुटुंबाला झोकून देऊन मरण यातना सहन करणारे स्वा.विनायक दामोदर सावरकर म्हणजे स्वातंत्र्य संग्रामातील एक धगधगते यज्ञ कुंड होते असे प्रतिपादन वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीपकुमार बोरकर यांनी केले आहे. ते येथील स्वा. सावरकर नगर परिषद शाळा क्र.5 मध्ये स्वा.सावरकर यांच्या पुण्यतिथी व पालक मेळाव्या निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भालेराव, अतिथी म्हणून शिक्षण सभापती अक्षता चव्हाण, नगरसेविका वर्षाताई खुसपुरे, हरिहर भागवत, माजी मुख्याध्यापक गुलाबराव खुसपुरे, प्रशासन अधिकारी संजय पवार, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मोहसीना खान उपस्थित होते.

प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना भालेराव यांनी स्वा. सावरकर यांच्या देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या जीवन पटाचा आढावा घेऊन त्यांच्या सह संपूर्ण सावरकर कुटुंबाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टाचे वर्णन केले. संपूर्ण जगात देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी दोन, दोन जन्मठेपेसह अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे एकमेव कुटुंब आहे. इंग्रजांच्या तावडीतून सुटण्यासाठी जहाजावरून समुद्रात उडी घेऊन निसटण्याचा प्रयत्न सावरकरच करू शकतात. अंदमानला शिक्षा भोगण्यासाठी जातांना किड्यामुंग्यांचा संसार तर सर्वच करतात पण आपण देशाचा संसार करू, काही प्राप्त करण्यासाठी कुणाला तरी स्वतःला गाडून घ्यावे लागते हे आपल्या नववधूला सांगण्याचे धारिष्ट सावरकारात होते. काळ्या पाण्याची शिक्षा भोगतांना महाकाव्य लिहण्याची अदभुत प्रतिभा त्यांच्यात होती म्हणून ते स्वातंत्रवीर झाले असे प्रतिपादन त्यांनी केले.

या प्रसंगी हरिहर भागवत, गुलाबराव खुसपुरे, यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना उद्बोधन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी केले. सुत्रसंचालन जेष्ठ शिक्षिका मीना काशीकर यांनी व आभार प्रदर्शन रजनी पोयाम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेमदास डंभारे, अविनाश तुंबडे, गीतांजली कोंगरे, दर्शना राजगडे यांनी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share