WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चीनमध्ये विषाणूबळींच्या प्रमाणात प्रथमच घट

Image

चीनमध्ये करोना विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या आता २९४३ झाली असून सोमवारी ३१ जणांचा मृत्यू झाला तर १२५ निश्चित रुग्ण सापडले आहेत. देशात प्रथमच दिवसातील रुग्ण व मृतांची संख्या खाली आली आहे.

जगात आतापर्यंत करोनाने घेतलेल्या बळींची संख्या तीन हजारांवर गेली असून ८९ हजार लोकांना संसर्ग झाला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की १२५ नवीन रुग्ण सापडले असून सीओव्हीआयडी १९ विषाणूने सोमवारी ३१ बळी घेतले. जगात एकूण ८९ हजार ५२७ निश्चित रुग्ण असून ३०५६ जणांचा मृत्यू झाला आहे. निश्चित रुग्णांची दैनंदिन संख्या चीनमध्ये सोमवारी कमी झाली असून करोना विषाणू संसर्ग आता स्थिर पातळीवर आहेत, त्यात वाढ होताना दिसत नाही. चीनमधील निश्चित रुग्णांची संख्या सोमवारी ८०हजार १५१ होती. ३० हजार ४ रुग्णांवर उपचार सुरू असून ४७ हजार २०४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. हुबेई प्रांतात निश्चित रुग्णांची संख्या ६७ हजार २१७ असून एकूण मृत्यू २८३४ आहेत. वुहानमध्ये २२५१ मृत्यू झाले आहेत. वुहानमध्ये सोमवारी १११ निश्चित रुग्ण असून २४ जण मरण पावले आहेत. हुबेईत उपचारानंतर २४१० रुग्णांना सोडून देण्यात आले. उपचार करून सोडून दिलेल्या रुग्णांची संख्या आता ३६ हजार १६७ झाली आहे. जपानमध्ये ९८० लोकांना संसर्ग झाला असून १२ जण मरण पावले. अमेरिकेत सहा जण मरण पावले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share