WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चीनसह जगात करोनाचे तीन हजारावर बळी

Image

चीनमध्ये विषाणू संसर्ग ओसरण्याच्या मार्गावर असून मंगळवारी ३८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता २९८१ झाली असून जगातील करोना बळींची संख्या ३१०० झाली आहे. मंगळवारी चीनमध्ये मृतांची संख्या २९८१ होती तर निश्चित रुग्णांची संख्या ८०२७० होती. जगात एकूण ३१२३ लोक मरण पावले असून निश्चित रुग्णांची संख्या ९१७८३ झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे की, मंगळवारी ३१ प्रांतात एकूण ११९ नवीन रुग्ण सापडले असून त्यातील ११५ हुबेई प्रांतातील आहेत.

हुबेईच्या बाहेर चार नवीन रुग्ण सापडले असून ३ फेब्रुवारीला दैनंदिन रुग्णांची संख्या ८९० होती. चीनच्या इतर भागांत रुग्ण संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. ३८ पैकी ३७ मृत्यू हुबेई प्रांतातील असून एक मंगोलिया स्वायत्त भागातील आहे. दरम्यान मंगळवारी नवीन संशयित रुग्णांची संख्या १४३ होती.

देशातील संशयितांची संख्या ५२० आहे. मंगळवारी गंभीर रुग्णांची संख्या ३९० ने कमी होऊन ६४१६ झाली तर २६५२ जणांना रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात आले आहे. एकूण निश्चित रुग्णांची संख्या ८०२७० असून २७४३३ जणांवर उपचार सुरू आहेत. ४९५८६ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मंगळवारअखेरीस हाँगकाँगमध्ये १०० निश्चित रुग्ण, दोन मृत्यू, मकाव १०, तैवान ४२ रुग्ण, एक मृत्यू अशी स्थिती आहे.

दक्षिण कोरियात एकूण ५३२८ रुग्ण असून १४२ नवीन रुग्ण बुधवारी नोंदले गेले तर ३२ जणांचा मृत्यू झाला. इटलीत ७९ बळी गेले असून २५०२ निश्चित रुग्ण आहेत. करोनाने इराणमध्ये ७७ जण मरण पावले तर २३३६ निश्चित रुग्ण आहेत.

जपानमध्ये एकूण १००० रुग्ण असून १२ बळी गेले आहेत. अमेरिकेत सात बळी गेले असून १०० रुग्ण आहेत. ब्रिटनमध्ये ३९ रुग्ण असून फ्रान्समध्ये २१ नवीन रुग्णांसह एकूण २१२ रुग्ण आहेत. चार जण मरण पावले आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share