WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर : सरपंचपदाची थेट निवड नाहीच

Image

तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने २४ फेब्रुवारी रोजी जाहीर केला आहे. परंतु, यात थेट सरपंच निवडीसाठी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले नसल्याने निवडणूक आयोगाने सरपंचपदाची निवडणूक टाळून सदस्यांची निवडणूक निर्धारित कार्यक्रमानुसार घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे आता केवळ ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे.

तालुक्यातील १९ पैकी १६ ग्रामपंचायत ला निवडणूक होणार आहे. तालुक्यातील कुरूड ग्रा.पं. मधून १३ सदस्य निवडले जाणार आहेत. कोंढाळा ग्रा.पं.मधून ११, कसारी ७, बोडधा ११, एकलपूर ७, चोप ११, शंकरपूर ९, विहीरगाव ७, आमगाव ११, तुळशी ९, शिवराजपूर ९, पिंपळगाव ९, विसोरा ११, पोटगाव ९, डोंगरगाव ९, किन्हाळा ९, कोकडी ग्रा.पं.मधून ९ असे एकूण १६ ग्रामपंचायतीमधून १६१ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share