WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

देवाळा येथील अजून चार गायीवर वाघा हल्ला मारेगांव वनविभागाचा कारभार पांढरकड्यातून कर्मचारी झाले सैराट; वाघाने केले डझनभर पशुधन फस्त; शेतकऱ्यांत दहशत कायम

Image

•वाघाने केले डझनभर पशुधन फस्त; शेतकऱ्यांत दहशत कायम

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव)

कृषी प्रधान देशाचा पोशिंदा समजला जाणाऱ्या शेतकऱ्यांमागे आता वाघाचा ससेमिरा मारेगांव तालुक्यात सुरू झाला असुन गेल्या तिन महिन्यापासून शेतकऱ्यांचे डझनभर पाळीव प्राणी फस्त केले आहे.मात्र,या गंभीर बाबीकडे कमालीचे दुर्लक्ष संबंधित विभागाचे होत असताना मारेगांव वनविभागाचा कारभार तुर्तास पांढरकवडा येतुन हाकणे सुरू असल्याने प्रमुख वालीच नसल्याने कर्मचारीही सैराट झाले आहे. शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसानीकडे कायम दुर्लक्ष होत असल्याने संबंधित विभागाप्रतु संतापाची लाट पसरली आहे

मारेगांव वनपरिक्षेत्र कार्यालय असुन येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून गत चार महिण्यापासून येथील प्रभारावरील कामकाज पांढरकवडा येथून चालत आहे. त्यामुळे लाभार्थी तथा शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे यांचे अमावस्या पोर्णिमेलाच मारेगांवला दर्शन होवून कामकाजावर विपरीत परिणाम पडत आहे. अशातच मारेगांव तालुक्यात फिस्कीचे जंगल असुन. तिन महिन्याभरापासून वाघाने धुमाकूळ माजविला आहे तालुक्यातील देवाळा, वडगांव, गाडेगांव ,चनोडा, गदाजी, बोरी चिचाळा, मजरा येथील शेतकऱ्यांच्या पाळीव प्राणी असलेले गाय, वासरू, कालवड.,शेळी असे किमान डझनभराच्यावर असलेल्या पशुचा पडशा पाडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत कमालीची दहशत पसरली असुन सध्यास्थित उत्तरार्धात असलेला कापूस वेचणीसाठी या परिसरात मजूर येण्यास धजावत नसल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे सावट पसरले आहे. तर शिवारात गहू, चना भुईमूगची लागवड असलेल्या शेतात रानडुक्कराची करडी नजर नुकसाणीसाठी तारणहार ठरत आहेत

वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी यापुर्वी शिवारात कँमेरे लावून वाघाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला मात्र वाघ मात्र कँमेरात आलाच नसल्याने वनविभागाची ही मोहीम वांझोटी ठरल्याचे बोलले जात आहे. यातील काही कँमेरे काढण्यात आल्याची विश्वासनिय माहिती आहे. या गंभीर प्रकारावर वनपरिक्षेत्र अधिकारी थेट पांढरकवडा येथून उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रयत्न करित असताना या प्रकारावर एक प्रकारचे पांघरूण घालत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. मारेगांव वनविभागावर कुणाचाच वचक नसल्याने कर्मचाऱ्यासह मार्डी येथील बिट कर्मचारी सैराट झाले आहे. मार्डी येथील वनकर्मचारी काहीना ओल्या पाटर्य़ा देवुन आपले पितळ उघडे पड.नये म्हणून आटापीटा करित आहे. केवळ मर्यादिते राहून वनकर्मचारी आपले इप्सित साध्य करण्यावर भर देत असल्याने वनकर्मचाऱ्या च्या बेताल वागणूकीनेच शेतकऱ्यांच्या नुकसानीत दिवसागणिक वाढ होत असताना कर्मचाऱ्यासह वाघावर अंकुश लावण्यात हा विभाग सपशेल अपयशी ठरत असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया शेतकऱ्यां मधून उमटत असून संतापाची लाट पसरत आहे.

तिन गायीवर व एका कालवडीचा पाडला पडशा तालुक्यातील देवाळा येथील घटना वाघाने पडशा पाडून जखमी केले. यात शेतकऱ्यांमध्ये पुन्हा दहशतीचे सावट पसरले असताना वनविभागाची कुंभकर्णी झोप उडेल काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share