WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राज्यातील २१ दूरदर्शन केंद्रे बंद होणार

Image

केंद्र सरकारच्या अखत्यारितील राज्यातील २१ दूरदर्शन प्रक्षेपण केंद्रे येत्या ३१ मार्चला मध्यरात्रीपासून बंद केले जाणार आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व उमरखेडसह विदर्भातील सात प्रक्षेपण केंद्रांचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारितील राज्यातील २१ दूरदर्शन प्रक्षेपण केंद्रे येत्या ३१ मार्चला मध्यरात्रीपासून बंद केले जाणार आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व उमरखेडसह विदर्भातील सात प्रक्षेपण केंद्रांचा समावेश आहे.केंद्र शासनाच्या प्रसार भारतीअंतर्गत देशात दूरदर्शनचे लघु प्रक्षेपण केंद्र कार्यरत आहे. यापैकी राज्यातील २१ प्रक्षेपण केंद्र ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३ मार्चला त्यासंबंधीचा ई-मेल संबंधित प्रक्षेपण केंद्रात धडकला. मात्र हे प्रक्षेपण केंद्र नेमके का बंद करण्यात येत आहे, याबाबत ई-मेलमध्ये कोणताही खुलासा देण्यात आला नाही. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व उमरखेड, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, भंडारा जिल्ह्यातील तुमसर, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि बुलडाणा जिल्ह्यातील चिखली व खामगाव या सात केंद्रांचा बंद होणाºया केंद्रात समावेश आहे. याशिवाय नांदेड जिल्ह्यातील किनवट, सोलापूरमधील अकलूज, बदलापूर, खोपोली, महाड, म्हसले, पंढरपूर, परभणी, संगमनेर, सांगली, शहादा, शिर्डी, शिरपूर, उमरगा आदी केंद्राही बंद होणार आहे. या सर्व केंद्रांवरील प्रक्षेपण ३१ मार्चला मध्यरात्रीपासून बंद होणार आहे.

बहूतांश खासदार-आमदार अंधारात :

हे प्रक्षेपण केंद्र बंद करण्याबाबत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही. हे केंद्र बंद होणार असल्याने राज्यातील २५० कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. मात्र या सर्व कर्मचाऱ्यांना इतरत्र समायोजन करण्याबाबत अनिश्चितता कायम आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे.

देशातील १२५ केंद्रांचा समावेश:

महाराष्ट्रातील २१ लघु प्रक्षेपण केंद्रांसह देशभरातील तब्बल १२५ लघु प्रक्षेपण केंद्र बंद होणार आहे. प्रसार भारतीच्या मुख्य कार्यालयातून या सर्व लघु प्रक्षेपण केंद्रांना ई-मेल पाठविण्यात आला. त्यात ओरिसा राज्यातील दहा, बिहार एक, झारखंड एक, पश्चिम बंगाल एक, आसाम तीन, मेघालय एक, हरियाना चार, राजस्थान १३, उत्तर प्रदेश सात, झारखंड दोन, आंध्र प्रदेश आठ, कर्नाटक १५, तामीळनाडू दोन, तेलंगणा सात, चंदीगड चार, गुजरात १५ आणि मध्य प्रदेशातील दहा दूरदर्शन लघु प्रक्षेपण केंद्रांचा समावेश आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share