WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भाजपयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या नेतृत्वात निराधार लाभार्थ्यांचा तहसील कार्यालयावर धडक

Image

कोरपना तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्त्यांना नियमित मानधन मिळावे याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या नेतृत्त्वात तालुक्यातील शेकडो लाभार्त्यांनी तहसील कार्यालय कोरपना येथे धडक देऊन तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांना निवेदन दिले.

कोरपना तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे ५ हजार पाचशे लाभार्थी असून सदर लाभार्त्यांचे मानधन नियमित मिळत नाही दर ३-४ महिन्यांनी त्यांचे मानधन हे बँकेच्या खात्यात जमा करतात परंतु बँकेत जमा झाल्यावरसुद्धा बँकेचे अधिकारी लाभार्त्यांच्या खात्यात मानधन वर्ग करायला १ महिना लावतात त्यामुळे निराधार योजनेचे लाभार्थी नियमित मानधानापासून वंचित राहत आहेत.

तसेच बँकेत जेव्हा लाभार्थी मानधानासंदर्भात चौकशी करतात तेव्हा सुद्धा त्यांना बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना सन्मानजनक वागणूक मिळत नाही,तसेच त्यांना पैसे काढून देण्यासाठी टाळाटाळ करीत असतात.

तसेच तहसील कार्यालयातर्फे यापुढे लाभार्त्यांच्या खात्यात नियमित मानधान जमा केल्या जाईल व जे कोणी बँक कर्मचारी लाभार्त्यांशी सन्मानजनक वागणूक देणार नाही जर तशी लाभार्त्यांकडून तक्रार प्राप्त झाल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू असे आश्वासन तहसील महेंद्र वाकलेकर यांनी भाजपयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने व निराधार लाभार्त्यांशी चर्चा करताना दिले.

कोरपना तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे ३०० प्रलंबित प्रकरणे मंजूर केल्याचीसुद्धा माहिती तहसीलदार यांनी दिली. यावेळी कोरपना तालुक्यातील शेकडो संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी तहसील कार्यालय येथे उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share