WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शेतकऱ्यांचे अंत पाहू नका, जगाच्या पोशिंद्याचे अतोनात नुकसान होत आहे- दिनकर पावडे

Image

पंधरा दिवस उलटूनही तूर खरेदी बंदच, व्यवस्था नसल्याचे कारण पुढे आले

वणी- वणी तालुक्यातील अजूनही नाफेड ची तूर खरेदी सुरु झाली नसल्याने शेतकर्यांच्या दैनंदिन व्यवहारात अडचण निर्माण होत असल्याने कृषीउत्पन्न बाजार समिती,वणी यांच्यावर भाजपाचे जिल्हा महामंत्री दिनकरराव पावडे यांनी निष्ण साधला आहे. गेले पंधरा दिवस उलटूनही नाफेडकडून तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीकडून त्यांना आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून न दिल्यामुळे तूर खरेदी सुरु झाली नाही.

शेतकऱ्यांचे प्रती क्विंटल मागे किमान एक हजार रुपयाचे नुकसान होत असल्याचा आरोप पावडे यांनी केला आहे. एकीकडे केंद्र सरकार ने मोदी सरकारने खरेदी केंद्र सुरु करण्याचे आश्वासन दिले असताना तसेच त्याकरिता हवा असलेला निधी उपलब्ध करून दिला असतना सुद्धा इथल्या प्रशासकीय लोकांनी या तूर खरेदी केंद्राकडे पाठफिरविल्याचे दिसून येत आहे. व्यवस्था नसल्याचे कारण पुढे देत आहे. वणी तालुक्यातीलच नसून जिल्ह्यात कुठेच तूर खरेदी केंद्र सुरु झाली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

नुकतीच डीएमओ यांच्या बरोबर दूरध्वनी साधून विचारपूस केली असता व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आले आहे. यावर पावडे यांनी जर शासकीय व्यवस्था होत नसेल खाजगी व्यवस्था उपलब्ध करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे. तसेच शेतकरी बांधवानी चिंता करण्याचे काम नाही मी या सर्व प्रकारांत प्रामुख्याने जातीने लक्ष देत असून येत्या चार ते पाच दिवसात तृ खरेदी केंद्र सुरु होईल. अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने पावले उचलली जाईल असे भाजपचे जिल्हा महामंत्री दिनकरराव पवाडे यांनी वणी सिटी ला बोलताना सांगितले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share