WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या मुलीचे घवघवित यश...!!

Image

कुमार अमोल (सह्याद्री न्यूज)

मारेगाव तालुक्यातील आपटी या छोट्याशा गावातील शेतकरी राजू भगत यांच्या मुलीने परिस्थितिवर मात करत यश घवघवीत मिलविले आहे. अफाट स्वप्नाची इच्छा असताना घरची परिस्थति मात्र बेताचीच होती. तरी सुद्धा खचून न जाता ध्येय जिद्द आणि मेहनतिच्या बाळावर अखेर भाग्यश्री भगत जिंकली. आज ती एसटी महामंडळात बसचालक झाली आहे.

भगत कुटुंबातील भाग्यश्री ही दुसर्या क्रमांकाची मुलगी असून दोन बहिणी तिला आहेत वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शेतीमध्ये काम करायची. एमए, एम एस डब्लू एवढ मोठ शिक्षण घेउन ही आई-वडीलांना कामत हातभार लावायची. अखेर तिच्या हाती राज्य परिवहन महामंडळाची जाहिरात मिळाली आणि अर्ज केला व त्यात यशस्वी झाली. भाग्यश्री आज ती पुणे येथील एस टी महामंडळात विभागीय कार्यलयात प्रशिक्षण घेत आहेत.

एकदा नौकरी लागावी, अधिकारी व्हायच ही तिची फार इच्छा आणि स्वप्न होती. काही काळ भाग्यश्रीने वणी येथील वृतवाहिनीवर निवेदक म्हणून काम केले होते, तिच्या या यशा बद्दल सर्व स्तराहून अभिनंदन व कौतुक होत आहे. विशेष उल्लेखनीय, भाग्यश्री चा १आणि आई वडिलांच्या पाठपुराव्यामुळे हे सगळं होऊ शकले अस ती अभिमानाने जरी मी बसचालक झाले तरी माझी जिद्द आणि मेहनत चालूच आहे मि अधिकारी होइल त्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेईल, अभ्यास करेल अशी ती आवर्जुन सांगते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share