WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी येथील अनोखा खेळ गुद्दालपेंडी वर कोरोना वायरस चे सावट..... खेळाडू व प्रेक्षक निराश

Image

सागर मुने, वणी

संपूर्ण महाराष्ट्रात फक्त वणी येथे रंगपंचमी च्या दिवशी सायंकाळी गुद्दलपेंडी हा दमदार मारामारी चा खेळ खेळण्यात येतो, मात्र कोरोना वायरस मुळे गुद्दलपेंडी हा अनोखा खेळ होणार नसल्याने सर्व खेळाडू व रसिक निराश झाले. शासनाच्या आदेशाने रद्द करण्यात आला आहे.

संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं. मैदानामध्ये दोरीच्या दोन्ही बाजुंला स्पर्धक. व्हिसल वाजताच एका हाताने दोर पकडून तर दुस-या हाताने प्रतिस्पर्ध्यांना ठोसे लावणे सुरू. मैदानात फक्त थरार. प्रेक्षकांचा जल्लोष शिगेला. कोण दोर सोडेल याची उत्कंठा शिगेला. अखेर एक स्पर्धक दोर सोडतो आणि पराभव स्वीकार करतो. हा रोमांचक आणि थरारक खेळ आहे गुद्दलपेंडी. जो केवळ धुलीवंदनालाचं खेळला जातो आणि महाराष्ट्रात फक्त एकाच ठिकाणी खेळला जातो. ते गाव म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातले वणी...

हा खेळ ना कुठल्या धर्माचा ना कुठल्या जातीचा, ना कुठल्या प्रांताचा तर हा फक्त आणि फक्त वणीकरांचा खेळ आहे. जो इतरत्र कुठेही खेळला जात नाही. वणीच्या दक्षिण दिशेला प्राचीन असे रंगनाथ स्वामीचे मंदिर आहे. या मंदिरासमोरच्या यात्रा मैदानावर गुद्दलपेंडीची तयारी केली जाते..मैदानावर तीस ते चाळीस फुटावर दोन खांब गाडले जाते. जसे खोखो खेळामध्ये असते अगदी तसेच. त्या खांबाला जमिनीच्या तीन ते चार फुटाच्या अंतरावर मिरवणुकीत फिरवलेला दोर बांधला जातो.अंधार झाला की या खेळाला सुरुवात होते. नाडा बांधल्यानंतर खेळाडू मैदानात उतरतो व नाड्याच्या एका बाजूला जाऊन दुस-या प्रतिस्पर्धीला आव्हान देतो. दुसरा स्पर्धक आव्हान स्वीकारून मैदानात उतरतो आणि सुरूवात होते गुद्दलपेंडीला.गुद्दल म्हणजे ठोसे व या ठोसे मारण्याचा खेळ म्हणजे गुद्दलपेंडी. यात कोणते बक्षीस नसते तर साहस, मनोरंजन आणि वैर मिटवण्यासाठी हा खेळ खेळला जातो. हा खेळ नेमका कधी पासून सुरू झाला याची निश्चित माहिती नाही. पण सुमारे 70-80 वर्षांचे बुजुर्ग त्याच्या लहाणपणापासून हा खेळ पाहत असल्याचे सांगतात. त्यावरून सुमारे 150 वर्षांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा असल्याचा अंदाज लावला जातो. ठोसे लगावताना नाड्याच्या खालून ठोसे लगावण्याची मनाई आहे. धरलेला नाडा सोडला किंवा नाड्याचा स्पर्श सुटला की तो स्पर्धक बाद ठरतो व दुस-या स्पर्धकाला विजयी घोषीत केले जाते. ही लढत दोन ते पाच मिनिटांपर्यंत चालते. विजयी व पराभूत झालेला स्पर्धक एकमेकांची गळाभेट घेतात आणि ती लढत तिथे संपते. हा खेळ तसा मारधाड आणि ऍक्शनचे भरपूर आहे. मारामारीत बदले की आग वगैरे ही आहे. पण हा जरी मारधाड करण्याचा खेळ असला तरी याचा उद्देश मात्र वैर संपवणे आहे. पूर्वी एकमेकांशी वैर असले की ते लोक गुद्दलपेंडीत लढायचे. ठोसे लगावून एकमेंकांवरचा पूर्ण राग काढायचे. जसा चित्रपटात मारधाड नंतर शेवट गोड होतो, तसाच या खेळात लढत संपली की गळाभेट घेऊन लढतीसोबतच वैरही संपवलं जातं.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share