WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पुण्यात आढळले करोनाचे दोन रूग्ण; उपचार सुरू

Image

पुण्यात करोनाचे दोन रूग्ण आढळले असून त्यांच्यावर नायडू रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. संबंधित रूग्णांना नायडू रूग्णालयातील करोना कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांनी २० फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारीदरम्यान दुबईचा दौरा केला होता.

भारतात परतल्यानंतर त्याच्या सर्दी, खोकला आणि ताप ही लक्षणं दिसून आली. त्यामुळे ते सोमवारी नायडू रूग्णालायात दाखल झाले. त्यानंतर केलेल्या तपासादरम्यान त्यांच्यापैकी एकाला करोनाची सौम्य लागण झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू करण्यात आले असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली. तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येणार असून त्यांच्यावरही लक्ष ठेवण्यात येणार असल्याचं रूग्णालयाकडून सांगण्यात आलं.

दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कोरोनाचे दोन संशयित रुग्ण पुण्यात आढळले आहेत. तसंच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. नागरिकांनी घबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. तसंच कोणत्याही ठिकाणी वावरताना वैयक्तिक स्वच्छता पाळावी. तंसंच खोकताना, शिंकताना मास्क ऐवजी, रूमाल वापरावा असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे.

विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग

दरम्यान, ‘करोना व्हायरस’चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची विमानतळावर ‘थर्मल स्क्रिनिंग’ केली जात आहे. त्यांचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे फॉर्म भरून घेतले जात आहेत. दिल्ली विमानतळावर फॉर्मचा तुटवडा असल्याने प्रवाशांना दीड ते दोन तास ‘इमिग्रेशन काऊंटर’वर रांगेत उभे रहावे लागत आहे. करोनाच्या भीतीमुळे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांकडून पत्ता आणि आजाराची लक्षणे याबाबत एक फॉर्म भरून माहिती गोळा केली जात आहे. परंतु तो भरण्याची प्रवाशांना कल्पना नसल्याने गोंधळ उडतो. मात्र विमानतळावर त्यामुळे भारतीय नागरिकांचा गोंधळ होत आहे. प्रारंभी काही ठराविक देशांमधून आलेल्या प्रवाशांकडूनच असा फॉर्म भरून घेतला जात असे.

यासंदर्भात काठमांडूवरून दिल्लीत आलेले पुण्याचे शिरीश पाठक म्हणाले, दिल्ली विमानतळावर ‘थर्मल’ तपासणीसाठी दोन फॉर्म भरावे लागतात. एका फॉर्मच्या दोन प्रती भराव्या लागत आहेत. पण एअरलाईन्सकडून एकच फॉर्म दिला जातो. हे दोन फॉर्म आरोग्य विभाग आणि इमिग्रेशन केंद्रासाठी हवी असते. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा फॉर्म आणून रांगेत लागावे लागते. त्यानंतर ‘इमिग्रेशन काऊंटर’समोर मोठी रांग लागली होती. तेथे एक तास गेला. तेथे १२ काऊंटर होते, पण चार-पाचच अधिकारी होते. रांगेत लागणाऱ्यांची एवढी गर्दी होती की, येथे करोना विषाणूची बाधा होण्याची भीती होती. याबाबाबत इमिग्रेशन विभाग हतबल दिसून आला. रविवारी गर्दी आणि विलंबामुळे प्रवाशी संतापले आणि घोषणा देऊ लागले.

परदेशी नागरिकांसाठी वेगळे काऊंटर

विमानतळावर परदेशी नागरिकांना वेगळे आणि भारतीयांना वेगळे काऊंटर देण्यात आले आहे. मात्र, फॉर्मबद्दल आगाऊ सूचना न देणे आणि ते पुरेसे उपलब्ध नसल्याने प्रवाशांचा वेळ जात आहे. शिवाय इमिग्रेशन केंद्रात परदेशी आणि भारतीय नागरिकांना देखील फॉर्म जमा करावा लागत आहे . यामुळे विमानतळावर गोंधळाची स्थिती आहे, असेही पाठक म्हणाले. दरम्यान, विमान वाहतूक कंपन्यांनी भारतात येणाऱ्या प्रवाशांनी या फॉर्मचे प्रिन्ट काढावे, ते भरून इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. कारण, फॉर्मचा तुटवडा आहे, असे म्हटले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share