WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चंद्रपुरात पाचवीतील विद्यार्थ्याचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू

Image

चंद्रपूर- मित्रासह आंघोळ करावयास गेलेल्या एका पाचवीतील विद्यार्थ्याचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव येथे घडली. संस्कार संजय मोगरे (वय ११), असे मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

नांदगाव येथील संस्कार संजय मोगरे हा सकाळी आपल्या पाच मित्रांसोबत रंगपंचमी साजरा करत होता. एकमेकांना रंग लावल्यानंतर संजय आपल्या मित्रांबरोबर गावालगत रस्त्याच्या बांधकामाने निर्माण झालेल्या व पाण्याने भरलेल्या मुरुमाच्या खड्ड्यात आंघोळ करायला गेला. सहाही मुले आंघोळ करण्यासाठी खड्ड्यात उतरली. पण संस्कारचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच संपूर्ण गाव एकत्र आले. पण, संस्कारचा मृत्यू झाल्याने ते काहीच करू शकले नाही. या दु:खद घटनेमुळे परिसरातील अनेक गावांनी रंगपंचमी साजरी करण्यास टाळले. संस्कार हा विठ्ठलवाड्यातील शिवाजी विद्यालयात पाचव्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याच्या अकस्मात मृत्यूने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR