WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

Coronavirus : इटलीत एका दिवसात ८२७ बळी

Image

चीनमध्ये जन्माला आलेल्या करोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. ९० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आवाक् करणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत एकट्या इटलीमध्ये तब्बल ८२७ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

चीननंतर करोनाचा सर्वाधिक फटका इटली या देशाला बसला आहे. आतापर्यंत १२ हजार ४४२ करोना संशयीत रुग्ण इटलीमध्ये सापडले आहेत. त्यापैकी ८२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी हा आकडा १९६ इतका होता. मात्र गेल्या २४ तासांत यात ३१ टक्क्याने वाढ होत तब्बल ८२७ लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. दरम्यान एक हजार ४५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले