WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती सप्ताह उत्साहात.... विविध कार्यक्रमांचे आयोजन

Image

सुरज चाटे वणी : येथील वसंत जिनिंग सभागृह शेतकरी मंदिर परिसर वणी येथे दिनांक 24 ला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षातील मोठं मोठ्या दिगज्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार घेण्यात आला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 159 व्या जयंती निमित्य यवतमाळ जिल्ह्य काँग्रेस कमिटी द्वारा संपूर्ण यवतमाळ जिल्यात महात्मा गांधी यांच्या विचारांचा व कार्याचा संदेश देण्याकरिता विविध कार्यक्रमांचे व संदेश यात्रेचे करण्यात आले होते या निमित्य वणी येथे या यात्रेचा शुभारंभ दिनांक 24 ऑक्टोबर रोज बुधवार ला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान वसंत जिनिंग सभागृह येथे घेण्यात यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा म. ना. जोशी, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार वजाहात मिर्झा, प्रमुख अतिथी म्हणून माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, तसेच माजी आमदार वामनराव कासावार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य ऍड देविदास काळे, उपस्थित होते, कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला असून गांधीजी चे विचार सर्वांनी आपल्या अंगी जोपासावे त्यांचे विचार बहुमूल्य आहे असे बहुमूल्य विचार उपस्थितांनी मांडले.

यावेळी काँग्रेस सेवादल यवतमाळ चे नवनिर्वाचित अध्यक्ष राजीव कासावार यांचा उपस्थित मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार वामनराव कासावार यांनी केले तर संचालन विवेक मांडवकर यांनी केले या कार्यक्रमाला कॉंग्रेस प्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.