WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरेगाव भीमा हिंसाचार: शरद पवारांना समन्स, ४ एप्रिल रोजी हजर राहण्याचा आदेश !

Image

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समन्स बजावण्यात आलं आहे. कोरेगाव भीमा आयोगाकडून हे समन्स बजावण्यात आलं असून ४ एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. २०१८ रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची कारणं आयोगाकडून तपासली जात असून त्याच पार्श्वभूमीवर हे समन्स बजावण्यात आलं आहे. यावेळी शरद पवारांची साक्ष नोंदवली जाण्याची शक्यता आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करत असलेल्या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी याआधी शरद पवारांची साक्ष नोंदवली जाणार असल्याचं सांगितलं होतं. शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांची साक्ष नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......