WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मारेगांवात जुगारावर छापा, सहा जनावर गुन्हा दाखल

Image

•मारेगांव पोलिसांची बेधडक कारवाई...!!

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव)

शहराच्या हाकेवर असलेल्या कान्हाळगांव रोडच्या बाजूला दि. १६ मार्च 2020ला सायंकाळी च्या सुमारास जुगार खेळणाऱ्यास्थळी मारेगांव पोलीसानी छापा टाकून सहा आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, किमान तिस.हजार रूपये रोख जप्त करून सहा संशायितावर बेधडक कारवाई करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार मारेगांव तालुक्यातील कान्हागांव रोडवर एका शेतात टिणाच्या शेडमध्ये काही आंबटशौकीन नियमित जुगार खेळत असतात अशी पोलीसांना गुप्त माहिती मिळाली. त्या आधारावर दिनांक १६मार्च रोजु उप पोलीस निरिक्षक ए.एम. चौधरी यांच्या नेतृत्वात जमादार सुरेद्र टोगे, किशोर आडे,.प्रमोद फुफरे या पोलीस पथकानी यांनी नियोजन करून छापा मारला असता संशायित आरोपी राहुल राठोड, अरुण जयराम मुरस्कर ,नंदकुमार खापने, मतीन अनवर शेख, जगदीश पाटील, विकास चौधरी यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडुन त्यांचेकडून ५२पत्ते व.२९,८५०रूपये जप्त करण्यात आले. मुंबई जुगार कायद्या अंतर्गत नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे. दरम्यान, सदर.घटनास्थळी आंबटशौकीन नेहमीच आपला व्यवसाय थाटल्यासारखे जुगार खेळत असल्याची चर्चा आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......