WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

डॉ.प्रितेश बत्तलवार राष्ट्रीय सन्मान पुरस्कारांनी सन्मानित

Image

सुरज चाटे वणी :- केंद्रीय मानवाधिकार संगठन, नवी दिल्ली द्वारा राष्ट्रीय संमेलन व राष्ट्रीय सन्मान समारोह २०१८ नागपूर रविभवन येथे दिनांक ११ ऑक्टोबर २०१८ Image रोजी आयोजित कार्यक्रमामध्ये पांढरकवडा येथील प्रख्यात डॉ. प्रितेश मल्हारी बत्तलवार यांना ग्रामीण, आदिवासीय, चिकित्सा व व्यसनमुक्ती तसेच मानवीय आरोग्य रचनात्मक कार्यासाठी चिकित्सारत्न सन्मान व समाजामध्ये मानवाधिकार रक्षा, रचनात्मक सामाजिक कार्य, समाजसेवा क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी समाजरत्न सन्मान पुरस्काराने राष्ट्रीय अध्यक्ष्य श्री. मिलिंदजी दहिवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. भारतातील विविध राज्यातील मानवाधिकार, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर तसेच नागपूर उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश श्री. कैलास कानुंगो, राष्ट्रीय उपाध्यक्ष्य श्री. राजेंद्रसिह लोहिया, जेष्ठ पत्रकार श्री. मिलिंद पवनीपगार, श्री. अजय पात्रे, समाजसेवक श्री. शरद बागडी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान मा. डॉ. प्रितेश मल्हारी बत्तलवार यांना दिला गेला. डॉ. बत्तलवार हे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व असून आपल्या सृजनात्मक कौशल्याने समाजामध्ये जीवनधारा बहुउद्देशीय संस्था, पांढरकवडा च्या साहाय्याने सतत नवनवीन उपक्रम करत असतात, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून समाजात त्यांनी फार कमी वयात नावलौकिकता मिळविली आहे त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......