WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भाजी मार्केट मध्येलोकांची मोठ्या प्रमाणात झुंबड...शासनाने दिलेल्या आदेशाला वणीकरांचा कानाडोळा

Image

वणी शहर प्रतिनिधी:- *निलेश चौधरी*

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पाहण्यास मिळत असतांना ,शासनाने जनतेच्या भल्यासाठी, जमाव बंदी टाळण्याचे आदेश पारित केले. त्यासाठी पोलिस प्रशासन ,अहोरात्र झटतांना पहावयास मिळत आहे. त्यामुळे निम्म्याहुन अधिक वणी ,नियमाचे काटेकोर पालन करतांना पहावयास मिळत आहे. परंतु यालाच अपवाद म्हणजे, वणी येथील भाजी मार्केट ठरला आहे. या भाजी मार्केट मधी शेकडोंच्या संख्येने लोक गोळा होतांना दिसत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने यावर त्वरित मोठा निर्णय घेण्याची गरज आहे. जेणेकरुन शासनाच्या नियमाची पायमल्ली होऊ नये. एका बाजूने पोलिस प्रशासन भर उन्हात ,या भीषण वायरस पासुन नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी परिश्रम घेत आहे. तर दुसरीकडे पालिका प्रशासनाचे भाजी मार्केट मधी होत असलेल्या झुंबड कडे दुर्लक्ष करित आहे. जगाच्या नकाशावर अग्रेसर असलेल्या मोठ मोठे देश या कोरोनाला हरऊ शकले नाही.

त्यात भारतात मोठ्या प्रमाणात प्रयत्न करित आहे. परंतू वणीतील नागरिक या परस्थीतीला गंभीर घेत नसल्याचे चित्र सध्या वणी शहरात दिसत आहे. नागरिकांचा सेवेसाठी पोलीस 24 तास घराबाहेर दिसतात.

तरी त्यांच्या या कार्याला जनतेकडून सुध्दा व नगर परिषद कडुन योग्य ती साथ मिळावी .जेणेकरुना भविष्यात मोठ्या संकटातुन बचावा होईल. तरी पण गर्दी होऊ नये म्हणून संचार बंदी लागू केली असता ..याचा कुठल्याही फरक जनतेवर पडतांना दिसत नाही आहे. त्यामुळे नगर परिषदेने तात्काळ कठोर पावले उचलुन...शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे असे मोठ्या प्रमाणात जनते मधुन बोलले जात आहे.

नागरिक घराबाहेर पडणे ज्यावेळेस बंद होईल तेव्हाच कोरोनसोबत आपण लढाई जिंकू शकतो. हि बाब लक्षात घेणे खुप आवश्यक आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......