WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नागपुरात पठ्ठ्या कोरोनावर मात करुन घरी आला, आईकडून नजर उतरवून, औक्षण करुन गृहप्रवेश.

Image

नागपुरातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण बरा होऊन काल गुरुवारी 26 मार्चला घरी परतला. यावेळी त्याच्या घरी त्याच्या आईने त्याची नजर उतरवली. तसंच त्याला ओवाळून, औक्षण करुन स्वागत केलं. अमेरिकेवरुन आलेल्या या रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या त्याची पत्नी, मावस भाऊ आणि मित्रालाही कोरोना लागण झाली. या पहिल्या रुग्णाच्या तीन टेस्ट निगेटिव्ह आल्यावर डॉक्टरांनी त्याला बरं झाल्याचा निर्वाळा देत, रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र पुढील आणखी काही दिवस त्याला होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले