WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चार वर्षीय बालकावर अनैसर्गिक कृत्य……….

Image

वणी पोलिसात तक्रार दाखल, तपास सुरू...

सुरज चाटे वणी : वणी शहरातील खडबडा परिसरात राहणाऱ्या Image चार वर्षीय बालकाला शौचास घेऊन त्याच्यावर २२ वर्षीय तरुणाने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. याची तक्रार वणी पोलिसात दाखल झाली असून पुढील कारवाई वणी पोलीस करीत आहे.

शहरातील खरबडा भागात राहणारा तरुण मोलमजुरीचे काम करतो. पत्नी मुलगा आणि तो तिथे वास्तव्यास आहे. शेजारीच अफसर खान अहेमद खान हा तरुण राहतो.मंगळवारी दुपारी अफसरने शेजारीच राहणाऱ्या चार वर्षीय बालकाला शौचास नेण्याचा बहाणा करून बाहेर नेले. बाळाची आई घरीच होती. Image बालक रडत रडत घरी परत आल्यावर तिला बालकांवर अनैसर्गिक कृत्य केल्याचे दिसून आले. बाळाचे वडील रात्री कामावरून घरी परतले. प्रसंगी बाळाच्या आईने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. Image बाळाच्या वडिलांनी वणी ठाणे गाठून अफसर विरुद्ध तक्रार दाखल केली. वणी पोलिसांनी बालकाचे लैंगिक शोषण, बालकाचा हक्क व कायदा नुसार भारतीय दंड विधान कलम ३७७,५११,८,१८ नुसार गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हिवसे करीत आहेत.

Image

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले