WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून सहा ठार

Image

प्रतिनिधी कुमार अमोल

यवतमाळ: राळेगाव तालुक्यातील गुजरी नागठाणा-शिवारात रविवारी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी नागठाणा येथील गोंडे यांच्या शेतात टीनपत्रात राहणाऱ्या एका घरावर वीज कोसळली. त्यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन दांपत्याचा समावेश आहे.
अभिमान आंबाघरे 60, मंदाबाई अभिमान आंबाघरे 50 आणि साहेबराव देवतळे 45 व पीसबाई साहेबराव देवतळे 40 अशी ठार झालेल्या दोन दाम्पत्याची नावे आहे. याशिवाय लक्ष्मण बापूराव कोहळे 50 आणि सुभाष राजू नेहारे 20 हे दोघे ठार झाले. अभिमान आंबाघरे व मंदाबाई आंबाघरे व लक्ष्मण कोहळे आणि सुभाष नेहारे हे निमगव्हाण ता. कळंब जि. यवतमाळ येथील रहिवाशी आहे. तर देवतळे कुटुंब कोडपाखिंडी येथील रहिवासी आहे. सोमवारी सकाळी शेतमालक अरुण गोंडे शेतात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांनी लगेच राळेगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा सुरू केला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......