WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चंद्रपुरातील कोरोना संशयित रुग्णाचा नागपुरात मृत्यू !

Image

एका खासगी हॉस्पिटलमधून कोरोना संशयित म्हणून मेयोमध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा दोन तासातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.विशेष म्हणजे हा व्यक्ती चंद्रपुरातील असून गेले पाच दिवस नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती होता.

एका खासगी हॉस्पिटलमधून कोरोना संशयित म्हणून मेयोमध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा दोन तासातच झाल्याने खळबळ उडाली. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सर्वांनाच अहवालाची प्रतीक्षा आहे.

या रुग्णासह नागपुरात रुग्णाची संख्या १६ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथील ५५ वर्षीय व्यक्ती गेल्या पाच दिवसांपासून एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती होता. डॉक्टरानुसार रुग्णाला सर्दी, खोकला व दम लागत होता. त्याचे सिटिस्कन केले असता न्युमोनिया असल्याचे दिसून आले. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व न्युमोनिया रुग्णांची चाचणी करण्याचा सूचना आहेत. त्यानुसार या रुग्णाच्या चाचणीसाठी सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मेयोला आणले. रुग्णाला वॉर्ड क्र. ४ मध्ये दाखल करण्यात आले. परंतु दोन तासातच त्याचा मृत्यू झाला.

कोरोना संशयित रुग्णाच्या मृत्यूने सर्वांनाच नमुन्याचा काय अहवाल येतो, याची प्रतीक्षा लागली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.