WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रानडुक्कराच्या हल्ल्यात शेतमजुर युवक ठार,

Image

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव-यवतमाळ)

मारेगांव तालुक्यातील पिसगांवगाव शिवारात खामनकर यांच्या शेतात ३ वाजताच्या सुमारास रानडुक्कराने शेतमजुरावर हल्ला चढवून ठार केले.

मृतक अनिल यादव आत्राम (वय ४०) रा.पांढरकवडा हा शेतमजुर विजय खामनकर यांच्या शेतात काम करुन घराकडे पर्यंत जात असताना शेताच्या काही अंतरवार रान डुक्कराने हल्ला चढवून ठार केले आहे. सदर घटना ३ वाजताच्या दरम्यान हा हल्ला केल्याने जवळपास कोणी नसल्याने युवकाची जिवन यात्रा संपली.

या घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी वनविभाग व पोलीस कर्मचारी तत्काळ पोहचले व पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृत्युदेह मारेगांव ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास वनविभाग व पोलीस विभाग करत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले