WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आज श्री दत्त मंदीराचे विश्वस्त सचिव मा श्री किशोरजी वैद्य ह्यांनी पीएम केअर्स निधीला रु 5000 चा चेक मा श्री सुरेशजी कव्हळे ह्यांचे सुपूर्द केला !

Image

ह्या बाबत ग्राहक प्रहार सघटनेने त्यांना कोरोना महामारीला आपल्या मंदीर कडून मा पंतप्रधान ह्यांना मदत मिळावी हया विषया बाबत विश्वस्त अध्यक्ष मा श्री राजेंद्र वर्मा ह्यांचे सोबत चर्चा करून त्यांनी आज रु 5000 चा धनादेश दिला !

ह्या प्रसंगी ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर व ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सल्लागार प्रमुख तथा निवृत्त तहसीलदार मा श्री हणमंतू रजनलवार ,अभय निकोडे प्रामुख्याने उपस्थित होते !

पांढरकवडा शहरातून आता पर्यंत प्रगती दुर्गा मंदीर, साई मंदीर, श्री दत्त मंदीर ह्यांनी मा पंतप्रधान निधीस आर्थिक मदत केली असून ईतर मंदीर मदत करणार असल्याचे जिल्हा कोशाध्यक्ष सुनील धवने ह्यांनी कळविले आहे !

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले