WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अखेर राजूर प्रा आ केंद्राला मिळाले स्थायी डॉक्टर

ImageImage

सुरज चाटे वणी :- यवतमाळ जिल्ह्यातील राजूर कॉलरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीच नसल्याने गावातील विविध पक्ष व संघटनांनी ताला ठोको आंदोलन केले असता १५ दिवसात स्थायी डॉक्टर देण्यात येईल असे लेखी आश्वासन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिल्याप्रमाणे शनिवार पासून डॉ उघडे रुजू झाल्याने अखेर राजूर प्रा आ केंद्राला स्थायी वैद्यकीय अधिकारी मिळाले.

राजूर कॉलरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे ३४ गावाला जोडलेले व येथील कामगार बहुल क्षेत्राला आवश्यक असलेले आरोग्य केंद्र आहे. या केंद्राला दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा आहेत. त्यापैकी मागील काही काळापासून एकच वैद्यकीय अधिकारी रुजू होते. परंतु त्यांची सुद्धा आरोग्य विभागाने दुसऱ्या ठिकाणी प्रभारी म्हणून उचलबांगडी केली. परिणामी येथे तब्बल अडीज महिने वैद्यकीय अधिकारी नसल्याने गावातील जनतेला आरोग्याच्या सेवा मिळणे बंद झाले होते. यावर येथील राजूर विकास संघर्ष समितीने सम्बंधित विभागाला निवेदने दिली. त्यांनतर गावातील कांग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्ष, मनसे, बिरसा ब्रिग्रेड, राजूर ग्राम युवा संघटना व आदिवासी युवा जनजागृती संघटनेला एकत्र आणून स्थायी वैद्यकीय अधिकारी प्रा आ केंद्राला दिला पाहिजे यासाठी प्रा आ केंद्राला दि ३१ ऑक्टो १८ ला ताला ठोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाला सामोरे जात तालुका आरोग्य अधिकारी डॉ विकास कांबळे यांनी स्थायी वैद्यकीय अधिकारी मिळत पावेतो प्रा आ केंद्रात रुजू राहील असे लेखी आश्वासन दिले तसेच यवतमाळ येथून येऊन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ किशोर कोसटवार यांनी १५ दिवसाचे आत स्थायी डॉक्टर देण्यात येईल असे लेखी आश्वासन आंदोलनकर्ते मारोती बलकी,वसंत पाटील, वसुंधराताई गजभिये,कुमार मोहरमपुरी, डेव्हिड पेरकावार, प्रवीण खानझोडे, अनिल डवरे,लिलाधरसूर्य आरमोरीकर, जयंत कोयरे, नंदकिशोर लोहकरे, राहुल कुंभारे, अंकुश पेटकर, ऍड अरविंद सिडाम,सुभाष पेंदाम,पंकज कांबळे, अमोल वानखेडे,या बातमीत प्रदीप बांदूरकर,संजय पिसे,कासीम हसन,बंडू ठमके यांना दिले होते. त्या प्रमाणे १० दिवसातच राजूर प्राथमिक आरोग्य केंद्राला स्थायी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ किशोर उघडे दि १० नोव्हे १८ पासून रुजू झाल्याने ताला ठोको आंदोलनाला मोठे यश प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरून निवासी राहवेत व २४ तास सेवा मिळावी हि मागणी मात्र अपुरी आहे. हि मागणी कधी पूर्ण होणार याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागून आहे.

ताला ठोको आंदोलनाला यश आले असून त्यांच्या आंदोलनामुळे राजूर वासीयांना स्थायी स्वरूपी डॉक्टर मिळाला आहे, राजूर वासीयांच्या काहीशा प्रमाणात का होईना समस्या सुटली असल्याचे दिसून येत असून नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.