WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

घरीच चाललेल्या जुगार अड्यावर पोलीसांची धाड

Image

सलग दुसर्या दिवशी सुध्दा, पोलिसांचे कार्यवाही सत्र सुरू

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

आज रोजी शहरात गस्त घालत असतांना , गुप्तहेराकडुन माहिती मिळाली की, साईनगरी येथे तारीख खान मुक्तार खान हा त्याचा घरी काही लोकांन सोबत जुगार खेळत आहे.

अशा माहिती वरुन धाड टाकली असता, गोलु उर्फ पवन यादव मच्छेवार (26), इंदिरा चौक वणी, अहमद अली समशेर अली (31), साईनगरी वणी , रोशन कादिर कुरेशी (37), काजिपुरा वणी , शारीक उर्फ बबलु शेख सत्तार शेख (32) साईनगरी वणी , तारीख खान मुक्तार खान(35) साईनगरी वणी हे इसम कुठल्याही प्रकारचा सोशील डिस्टसिंग व मास्क चा वापर न करता आढळून आले. आणि पत्ते खेळताना, पैशाची बाजी लावत असल्याची गोपनीय माहिती डिबी पथकाला मिळताच ,धाड टाकून 4590/- रोकड आणी पत्ताचा तशा रु. 50/- असा एकुण 4640/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन ,कार्यवाही करण्यात आली. सदर आरोपीने संचारबंदी व जमाव बंदी आदेशाचे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे व पैशाचा जुना खेळतांना भेटुन आल्याने आरोपी विरोधी कलम 4, 5, मजुका सह कलम 188 ,269 भां. द. वि. सह 51(ब) , राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापक कायदा 2005 अन्वये गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली. सदर कार्यवाही उप.पो.अधिक्षक सुशीलकुमार नायक, पो.नि.वैभव जाधव ,डिबी प्रमुख पोउपनी गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे ,सुनिल खंडागळे ,सुधिर पांडे, रत्नपाल मोहाडे , पंकज उंबरकर, दिपक वाड्रसवार ,अमित पोयाम यांनी केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले