WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ब्रेकिंग न्युज गावठी दारु विक्री करणार्या ईसमांवर,पोलिसांची कार्यवाही

Image

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

आज रोजी शहरात गस्त घालत असतांना , नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ,सरोदय चौक , लालपुलिया परिसरात, काही ईसम मोहाची गावठी दारु विक्री करत असल्याची माहीती मिळताच , धाड टाकली असता आरोपी दिलीप कवडु क्षीरसागर (36) , रा. सुभाषचंद्र चौक येथे , 5 लिटर मोहाची गावठी दारु , विलास पंढरी काळे(46) ,रा. बोधेनगर चिखलगाव, लालपुलिया परिसरात 5 लिटर मोहाची दारु ,गणेश कवडु आत्राम(22),रा. सरोदय चौक वणी येथून ,2 लिटर मोहाची गावठी दारु ,सापळा रचून जप्त करण्यात आली. अशी एकुण 12 लिटर गावठी दारु , किंमत 600 रुपये ..संपुर्ण शहरातून जप्त करण्यात आली. हे इसम हि गावठी दारु डपकी ,प्लॅस्टीक बाॅटल , मध्ये भरुन विक्री करीत असतांना ,मिळुन आल्याने जप्ती पंचनामा कार्यवाही करुन ताब्यात घेण्यात आले.

सदर ईसम हे (कोविड19) विषाणुचा प्रादुर्भाव असतांना , लोकांना गोळा करुन गावठी दारु विक्री करतांना आढळून आले. त्यामुळे त्यांचे कृत्य ,कलम 65(क) महाराष्ट्र दारूबंदी कायदा सह क्र.269 ,270 भांदंवी.अन्वये कार्यवाही करुन गुन्हाची नोंद करण्यात आली. सदर कार्यवाही उप.पो.अधिक्षक सुशीलकुमार नायक, पो.नि.वैभव जाधव ,डिबी प्रमुख पोउपनी गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे ,सुनिल खंडागळे ,सुधिर पांडे, रत्नपाल मोहाडे , पंकज उंबरकर, दिपक वाड्रसवार ,अमित पोयाम यांनी केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......