WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रशांत खैरे यांची प्रहार च्या शहराध्यक्ष पदी वरणी....

Image

विलास पवार यांनी नियुक्ती पत्र देऊन केली घोषणा...

सुरज चाटे वणी :- वणीतील प्रशांत खैरे यांची प्रहार पक्षाचे यवतमाळ जिल्हा प्रमुख विलास पवार, प्रमोद कुदळे, जिल्हा सचिव सिद्धीक रंगरेज याच्या उपस्थितीत वणी शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

प्रहार जनशक्ती पक्ष हा दिवसागणिक वाढत जात असून यात गोर गरीब जनतेच्या समस्यांचे निराकरण व त्यांना वाच्या फोडण्याचे काम आमदार बचू कडू यांच्या माध्यमातून पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते करीत असते यालाच साथ देत प्रहारचे जिल्हाध्यक्ष विलास पवार, महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे, यवतमाळ जिल्हा सचिव सिद्धीक रंगरेज आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितित प्रशांत खैरे यांना दिनांक 14 नोव्हेंबर ला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वणी शहर अध्यक्ष पदी नियुक्ती देऊन त्यांना कसून कामाला लागण्याचे सांगितले व प्रहार जनशक्ती पक्ष घरा घरात पोहचवा कोणतीही अडचण आल्यास आमदार बचू कडू तसेच प्रहार जनशक्ती पक्ष तुमच्या पाठीशी आहे असे यावेळी उपस्थितांनी बोलून दाखविले.

भविष्यात वणी शहरात तसेच वणीतील आदी परिसरात प्रहार कडून मोठं मोठी आंदोलन सुद्धा होऊ शकते गोर गोरीब जनतेला न्याय मिळवून देणे हाच प्रहार चा मुख्य उद्देश असून गोर गरिब शेतकरी, शेतमजूर जनतेवर अन्याय होऊ देणार नाही अन्याय झाला तर ते आम्ही खपवून घेणार नाही असे यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विलास पवार यांनी सांगितले. यावेळी बल्लूभाऊ जवंजाळ कार्याध्यक्ष तथा प्र.सं.प्र. वाशिम,यवतमाळ, बुलडाणा, प्रमोद कुदळे महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्र.सं.प्र. नांदेड,लातूर,नाशिक मंगेशभाऊ देशमुख राज्यप्रमुख प्रहार शेतकरी संघटना, विलास पवार जिल्हा अध्यक्ष सिध्दीक रंगरेज जिल्हा सचिव उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......