WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मानकी येथिल टाँवरचे काम त्वरीत बंद करा -विश्वास नांदेकर..... गावकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन....

ImageImageImageImage

सुरज चाटे वणी - तालुक्यातील मौजा मानकी येथे जिओ कंपनीच्या मोबाईल टाँवरचे काम बिना परवानगीने होत असुन महसुल विभाग तसेच ग्रा.पं. चि कोनत्याही प्रकारचि परवानगी न घेता नियम बाह्य काम सुरु असल्यामुळे गावकर्यांनी काम बंद करण्याकरीता शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वासभाऊ नांदेकर यांची भेट घेऊन ऩियम बाह्य होत असलेल्या टाँवरच्या प्रकरनाची माहीती सांगीतली असता त्यांनी सदर प्रकरन अापल्या हाती घेऊन मानकी येथिल गावकरी व शिवसैनिकांना सोबत घेऊन तात्काळ तहसिल कार्यालय गाठुन तहसिलदारांना सदर प्रकरनाची माहिती देऊन टाँवरचे काम त्वरीत बंद करण्याची मागणी केली.टाँवरचे काम बंद न झाल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने काम बंद करेल व त्यासाठी होणार्या घटनेला शासन.प्रशासन व संबंधित विभाग जबाबदार राहील असे निवेदन देतेवेळी सांगीतले.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर शरद ठाकरे तेजराज बोढे सुनिल ढुमने महेश चौधरी व मानकी येथिल उमेश सावरकर नथ्थु मोते प्रमोद क्षिरसागर शंकर मिलमीले परशुराम पोटे अरुन पुरी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमानात उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले