WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गडचिरोलीत पीएसआयच्या पत्नीची गोळी झाडून आत्महत्या

Image

मुलचेरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक धनराज गोविंद शिरसाट यांची पत्नी संगीता यांनी रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. हा थरार गुरुवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मुलचेरा येथील पोलीस क्वार्टरमध्ये घडला.ही घटना घडली त्यावेळी पीएसआय शिरसाट काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते तर त्यांचे आई-वडिल बाजारात गेले होते. पण सर्व्हिस रिव्हॉल्व्हर घरीच होती. त्या रिव्हॉल्वरमधून संगीता यांनी स्वत:वर गोळी झाडल्याचा अंदाज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.गोळीचा आवाज येताच ठाण्यात असलेले पोलीस निरीक्षक मिलिंद पाठक यांनी तिकडे धाव घेत जखमी संगीता यांना ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर रुग्णवाहिकेतून चंद्रपूरला हलविण्यात आले. कपाळातून शिरलेली गोळी डोक्यातून आरपार गेल्याने संगीता यांची प्रकृती गंभीर होती. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही, मात्र घरगुती कारणातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मूळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शिरसाट दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......