WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत युवा कॉग्रेसच्या वतीने" सेवादल पदयात्रे "चे स्वागत,,,,,,

Image

सुरज चाटे वणी - शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनतेला भेडसावणारे इंधन दरवाढ,महागाई, शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव मिळावा इत्यादी प्रश्न घेऊन जिल्हा कॉग्रेस सेवादल अध्यक्ष राजू कासावार यांच्या नेतृत्वाखाली झरी जामनी तालुक्यातील टाकळी येथुन दि १४ नोव्हे ते १९ नोव्हे २०१८ पर्यन्त निघालेल्या 'सेवादल पदयात्रेचे ' युवा कॉग्रेस वणी विधानसभा अध्यक्ष प्रताप तोटावार यांचे हस्ते दि १७ नोव्हे ला वणीतील गांधी चौक येते स्वागत करण्यात आले , Image

१४ नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती ते २९ नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती प्रयन्त झरी जामनी तालुक्यातील टाकळी ते वणी तालुक्यातील टाकळी प्रयन्त सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन ' सेवादल पदयात्रा ' निघाली आहे या यात्रेचे अनेक ठिकाणी स्वागत केले जात आहे दि १७ नोव्हेंबर ला साय ५ वाजताच्या सुमारास वणीतील चिखलगाव ते गांधी चौक प्रयन्त 'डोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत रॅली शहरातील प्रमुख मार्गानी गांधी चौक येते पोहचली येते स्वागत व मार्गदर्शन सभा येण्यात आली सभेचे अध्यक्ष मा वामनराव कासावर माजी आमदार वणी विधानसभा प्रमुख पाहुणे राजू कासावर जिल्हा कॉग्रेस सेवादल अध्यक्ष , देवानंद पवार,अँड देवीदासजी काळे अध्यक्ष वसंत जिनिग, प्रताप तोटावार युवा कॉग्रेस वणी विधानसभा अध्यक्ष, राकेश खुराणा,ओम ठाकूर , विवेक मांडवकर, प्रमोद वासेकर व कॉग्रेस पक्षाचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते आदी मान्यवरांच्या मार्गदर्शना नंतर सभेचे समारोप करण्यात आले व पदयात्रा पुन्हा मार्गस्थ झाली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले