WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीकर जनतेसाठी 14 घंटा गाड्यांचे लोकार्पण.... ना हंसराज अहिर यांची प्रमुख उपस्थिती...

Image

सुरज चाटे वणी - येथील विश्रामगृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये स्वच्छ वणी आणि सुंदर वणी या दिशेने नगरपरिषदेचे पाऊल टाकत वणीकर जनतेच्या सेवेसाठी व कचरा निर्मूलनासाठी तब्बल 14 घंटागाड्यांची APE ( छोटा हत्ती ) चे माननीय नामदार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर , आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेद्रजी बोर्ड, दिनकर राव पावडे , विजय जी पिदुरकर , यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. , Image

याप्रसंगी हंसराज अहिर यांनी नगरपरिषद वनीला शुभेच्छा देत जनहितार्थ असे चांगले निर्णय यापुढेसुद्धा वणी नगर परिषद घेत राहिल असे मत व्यक्त केले. तर आमदार बोदकुरवार यांनी आपन नगरपरिषद वणीच्या विकासासाठी सदैव तत्पर राहील अशी ग्वाही दिली. व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी आपण नगरपरिषदच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन केले. या गाड्यांची एकूण किंमत 63 लक्ष असून या गाड्या महाराष्ट्र शासनाच्या E Portal वरून खरेदी करण्यात आल्या. व त्या उद्यापासून जनतेच्या सेवेत दाखल होणार आहेत, या अत्याधुनिक गाण्यामुळे वणीच्या विकासामध्ये एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. याप्रसंगी आरोग्य सभापती सुभाष वाघडकर, नगरसेवक नितीन चहानकर, निलेश होले , प्रितीताई बिडकर , संगीताताई भंडारी, राकेश बुगेवार , मनीषाताई लोणारे, प्रशांत निमकर, अक्षताताई चव्हाण, स्वातीताई खरवडे, मायाताई ढुरके व अभियंता किशोर ढापले, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी व सर्व नगरसेवक व शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्ड यांनी वणीकर जनतेला आव्हान करत ओला कचरा सुका कचरा यांचे वर्गीकरण करून तो कचरा घंटागाडीत टाकण्यात यावा असे जाहीर आव्हान केले जेणेकरून स्वच्छ व सुंदर वनी होण्याकरिता सर्व जनतेचा हातभार लागेल.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले