WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरात दारू तस्करिंच्या दोन घटनांमध्ये पाच आरोपींना अटक

Image

प्रतिनिधी सुरज चाटे
शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणावरून पोलिसांनी दारू तस्करी करीत असलेल्या पाच आरोपींना अटक करून त्यांच्या कडिल दारू साठ्यासह इतर मुद्देमाल जप्त केला असून त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भालर मार्गे येणाऱ्या वाहनाची झडती घेतली असता त्यात ११ हजार ६४० रुपये किमतीची विदेशी दारू आढळल्याने पोलिसांनी दारूसह चारचाकी वाहन असा एकूण १० लाख ११ हजार ६४० रुपयांच्या मुद्देमालासह शीतल स्वर्गानंद हाडके (५१) रा. महाराणा प्रताप वार्ड बल्लारपूर, शामिजो राजन थानकन (तंगचन )(५०), रा. शिवनगर वार्ड बल्लारपूर, ओमप्रकाश मनाहरराव राऊत (५०) रा. विवेकानंद वार्ड बल्लारपूर जि. चंद्रपूर या आरोपींना अटक करून त्यांच्यावर अवैधरित्या दारूची तस्करी करणे या अंतर्गत कलम ६५ (अ )(ई ) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
दुसऱ्या घटनेत नांदेपेरा रोडवरील सेव्हनस्टार मॉल समोरून दोन इसम दुचाकीने काळ्यारंगाची बॅग घेऊन जातांना त्यांची झडती घेतली असता बॅगमध्ये ५ हजार ६०० रुपये किमतीची विदेशी दारू आढळून आल्याने पोलिसांनी दारूसह दुचाकी वाहन असा एकूण ५५ हजार ६०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी प्रदीप पंजाब ठमके (२७) रा. आपटी ता.मारेगाव, खुशाल कवडू कलोजवार (२९) रा. बंगाली कँम्प वरोरा जि. चंद्रपूर ह. मु. आपटी ता.मारेगाव यांना अटक करून त्यांच्यावर अवैधरित्या दारू बाळगणे या अंतर्गत कलम ६५ (अ )(ई ) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. ही कार्यवाही पोलिस अधिक्षक एम. राजकुमार , अप्पर पोलीस अधिक्षक नुरुल हसन व उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात नापोकॉ. इकबाल शेख, विजय वानखेडे, प्रदीप ठाकरे, आशिष टेकाडे, पोकॉ. संतोष कालवेलवार, अतुल पायघन, अशोक दरेकर, रवी इसनकर यांनी केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......