WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सुर्ला येथील शेतकऱ्याने घेतला बोरगाव शिवारात गळफास

Image

•इसमाचा जंगलात आढळला कुजलेल्या

अवस्थेत मृतदेह...!!

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव)

दि.१९ मे 2020 रोजी मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुर्ला येथील शेतकऱ्याने कर्जाच्या विवंचनेत बोरगाव जंगलात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारला संध्याकाळी उघडकीस आली.

हनुमान आत्राम (६०)असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांची २७ एकर शेती सुर्ला शिवारात आहे. मागील तीन वर्षांपासून नैसर्गीक संकटाने उत्पन्नात सातत्याने घट होत होती.अशातच त्यांचेवर तीन लाखाचे पीक कर्ज आणि खाजगी कर्ज असल्याने ते सतत चिंताग्रस्त राहत असल्याची माहिती मृतकाचा मुलगा अरुण याने दिली.

दरम्यान, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याने मागील दहा दिवसापूर्वी शेतीच्या कामाकरिता बाहेर जात असल्याचे कुटुंबियांना सांगितले होते. तेव्हापासून ते घरी परतले नव्हते.मंगळवारी सहा कि.मी.अंतरावर असलेल्या बोरगाव जंगलात गुराख्याला मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत निदर्शनास आल्याने पोलिसांना कळविण्यात आले.कुजलेल्या स्थितीत असलेला मृतदेह घटनास्थळी पुरण्यासाठी वनविभागाने नकार दिल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्याचा तोडगा उशिरापर्यंत निघाला नव्हता.यासाठी पोलीस पाटील,पोलीस प्रशासन व वनविभागाचे कर्मचारी दीर्घकाळ बैठकीच्या फैऱ्या झाडत आहे.मृतकाच्या मागे तीन मुले, एक मुलगी नातवंड असा आप्तपरिवार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......