WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

त्या मोमीनपुऱ्यातील वादातील आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी.....

Image

सख्ये मित्र झाले पक्के वैरी? :- 15 जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी...
वणी :- सुरज चाटे
वणीतील दोन बहूचर्चित समजल्या जाणाऱ्या दोन गटात मोमीनपुरा परिसरात बुधवारच्या मध्यरात्री प्रचंड हाणामारी झाली होती, दरम्यान त्यातील दोन्ही गटाच्या प्रमुखासह 14 जणांना अटक करण्यात आली होती व न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती, तसेच आणखी एकाला अटक केली त्यामुळे दिनांक 30 ला त्यांना विद्यमान न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
एकेकाळी सख्ये मित्र समजल्या जाणारे आता मात्र पक्के वैरी झाले? असाच काहीसा पेच असल्याचेच दिसत असून बुधवारच्या मध्यरात्री मोमीनपुरा परिसरात प्रचंड राडा झाला होता दरम्यान दोन गटात एकमेकांना मारहाण करण्यात आली त्यात काही गंभीर सुद्धा झाले व त्यांचा उपचार सुद्धा सुरू आहे, त्यातील जमीर खान उर्फ जम्मु महेबुब खान, बबलु अहेमद शेख, बाबुलाल उर्फ सयैद आरिफ सै शौकत, शाहेबाज शब्बीर चिनी, अक्रम खान सलिम खान, एजाज अली ताहेर अली, अब्दुल मकबुल उर्फ पायलट अब्दुल रज्जाक सर्व मोमीनपुरा वणी तसेच इजहार ग्यासौद्दीन शेख, रा. गुरूनगर, अब्दुल हाफिज उर्फ टापु अब्दुल सत्तार, रा- मोमीनपुरा, राजु फरिदाजी अडकिने, रा रंगनाथ नगर, मो- वसीम मो- जाबीर, हैदर खान वहिद खान, रा- गुरूनगर, सैयद तौसिफ सै- अब्दुल, रा- गुरूनगर, खुर्शीद हुसेन आबिद हुसेन या आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली होती वि- न्यायालय वणी येेेथे हजर केले असता वि- न्यायालयाने 02 दिवस पोलिस कोठडी मंजुर केली होती. त्यामुळे परत दिनांक 30 ला दोन दिवसानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR