WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ट्रक-दुचाकी धडकेत युवक ठार

ImageImageImage

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगांव-यवतमाळ)

आज मारेगांव शहरापासून तिन किलोमीटर अंतरावर असलेल्या करनवाडी फाट्याजवळ ट्रक व दुचाकी चा अपघात झाला. या धडकेत दुचाकी चालक तेजस पांडुरंग कोटनाके (वय ३८)रा. नरसाळा हा जागीच ठार झाला. या घटनेची माहिती पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना करनवाडी फाट्या जवळ शुक्रवारी दुपारी ४ दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. यावेळी अपघातानंतर ट्रक चालक सदर ट्रक सोडून पसार झाला आहे. अपघात इतका भीषण होता की दुचाकी चेंदामेंदा झाली. प्राप्त माहितीनुसार मालवाहतूक ट्रक हा मारेगावच्या दिशेने येत होता. तर दुचाकीस्वार गावाकडे जात असताना दुचाकी व ट्रकची जोरदार धडक होऊन दुचाकीस्वार तेजस पांडुरंग कोटनाके हा जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच मारेगांव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून पुढील तपास मारेगांव पोलीस करित आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले