WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोलार पिंपरी येथे कोंबडा बाजारावर वणी पोलिसांची धाड...साडेदहा लाखाच्या मुद्देमालासह 8 झनास अटक ....

Image

सुरज चाटे :- वणी तालुक्यातील (पिंपरी) कोलार या ठिकाणी कोंबड बाजार सुरू असल्याची गुप्त माहिती मिडताच वणीचे कर्तव्य दक्ष ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी आपली यंत्रणा कामाला लावीत मोठ्या शिथापीने दिणांक 5 ला (पिंपरी) कोलार येथे सुरू असलेल्या एका नाल्याच्या खाली कोंबड बाजारावर धाड टाकली असता त्यातून साडेदहा लाख रुपयांच्या मालासह 8 कोंबड बाजार शौकिनाना ताब्यात घेण्यात आले आहे. Image

वणी सह परिसरात कोंबड बाजार शौकीनांचे सध्या चांगलीच रंगत रंगताना दिसून येते तर कोंबड बाजार शौकीन आपला शौक पूर्ण करण्याकरिता झाड झुडपी जंगल व शांत ठिकाणाचा आडोसा घेत कोंबड्यावर आपले पैसे लावीत कोंबडयांची झुंज लावीत असतात. वणी तालुक्यातील (पिंपरी) कोलार येथे सुरू असलेल्या कोंबड बाजाराची माहिती वणीचे ठाणेदार यांच्या कानावर पडताच त्यांनी आपली यंत्रणा कामाला लावीत तातडीने घटनास्थळ गाठून सापळा रचून (पिंपरी) कोलार येथे पोहोचले असता काही इसम कोंबड्यावर पैज लावून कोंबड बाजाराचा आनंद लुटताना दिसून आले.

Image

काही जणांना पोलीस दिसताच त्यांनी आपला पळ काढला परंतु काही कोंबड बाजार शौकीन पडून जाण्यास अयशस्वी ठरल्याने त्यांना वणी पोलिसांनी ताब्यात घेतले त्यात महादेव मंगाम - 45 वर्ष, भोजराज टोंगे - 40, चरणदास वासेकर- 40, पुरुषोत्तम भगवान पोटे-44, विवेक बेले - 31, महादेव सोळंकी-४५, दिलीप सोळंकी- 30, मंगेश भोगेकर - 34 वर्ष या आठ कोंबड बाजार शौकिनांना ताब्यात घेण्यात आले असून, 6 नग कोंबळे, 4 लोखंडी कात्या, नगदी 15220/- रुपये, घटनास्थळी उभ्या असलेल्या 22 नग वेगवेगळ्या कंपनीचे मोटार सायकल असा एकूण दहा लाख सत्यांशी हजार दोनशे पणास रुपयांच्या मुद्देमलासह आठ झनास अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर 1289/18 कलम 12 (ब) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये कारवाई करण्यात आली, ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनात वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे, अनुप वाकडे, सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मागडे, अविनाश बानकर, नितीन सलाम, अजय शेंडे वाहन चालक सुरेश किनाके आदींनी पार पाडली असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Image

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.