WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यातील बोर्डा गावात शुल्लक कारणावरून चाकूने भोसकले

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

अतिशय शुल्लक कारणावरून एका तरुणाने एका युवकाला चाकूचे घाव देऊन गंभीर जख्मी केल्याची घटना तालुक्यातील बोर्डा गावात सकाळी ९ वाजता घडली असून पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंदविला आहे.

तालुक्यातील बोर्ड या गावातील रहिवासी असलेला आरोपी राजकुमार मारोती थाटे (२८) याने गावातीलच संतोष बालाजी निंदेकर (४०) याला शुल्लक कारणावरून चाकूचे घाव देऊन गंभीर जखी केले. जख्मी अवस्थेत त्या व्यक्तीला आधी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले व नंतर प्राथमिक उपचार करून त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. याबद्दल जख्मी युवकाचे वडील बालाजी दशरथ निंदेकर (६८) यांनी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणा बद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राजकुमार थाटे हा आपल्या दुचाकीने वणीकडे यायला निघाला असता संतोष निंदेकर याने त्याला नुसता गावात रिकामटेकडा फिरतो कामधंदा वैगेरे काही करत नाही अशाप्रकारे हिनवले असता आरोपीचा राग अनावर झाल्याने त्याने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने भोसकून संतोष निंदेकर याला गंभीर जख्मी केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३०७ नुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माया तापसे करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR