WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

झाडाची फांदी तोडून बाजूला करतांना क्रेनच घरावर उलटली

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

घराच्या बाजूला असलेल्या झाडाची फांदी तोडून बाजूला करत असतांना क्रेनचा तोल जाऊन झाडाच्या फांदीसह क्रेनही घरावर उलटल्याने घराचे मोठे नुकसान झाल्याची घटना दीपक चौपाटी परिसरात नुकतीच घडली आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठी वित्त हानी झाली आहे.

दिपक चौपाटी परिसरातील प्रवीण रामावत यांच्या घराच्या बाजूला असलेले वडाचे झाड विस्तीर्ण होऊन झाडीची अवाढव्य फांदी घरासमोर आल्याने ती तोडून क्रेनच्या साहाय्याने बाजूला करीत असतांना क्रेनचे संतुलन गेल्याने क्रेन फांदीसह घरावर उलटली. फंदीचे वजन क्रेनच्या वजन क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने संतुलन जाऊन क्रेन फांदीला बाजूने करतांनाच फांदीसह घरावर पलटी झाली. यात घराची रूम क्षतिग्रस्त झाल्याने रामावत यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून क्रेनचेही चांगलेच नुकसान झाले आहे. यात घरातील कोणतीही व्यक्ती अथवा ड्रॉयव्हरला शारीरिक इजा झाली नसल्याचे समजते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.