WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

इंदिरा सुतगिरणीतील साहित्य चोरी प्रकरणी नऊ आरोपींना अटक

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

तालुक्यातील शिरगिरी येथील इंदिरा सुतगिरणी मधिल सहित्य चोरी गेल्याच्या तक्रारी वरुन पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हे दखल केले आहे.

जवळच असलेल्या शिरगिरी गावातील अद्यापही सुरू न झालेल्या इंदिरा सुत गिरणी मधिल जूने टीनपत्रे, खुर्च्या, लोखंडी गज व अँगल तथा इतर साहित्य चोरीला गेल्याची तक्रार इंदिरा सुतगिरणीचे सुपरव्हाईजर प्रफुल शामराव उपरे (52) यांनी 16 ऑगस्टला वनी पोलीस स्टेशनला नोंदविली. 7 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजता ते 9 ऑगस्ट 10.30 वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सूतगिरणीतील साहित्य चोरी केल्याचा उल्लेख त्यांनी तक्रारीत केला. या तक्रारी वरुन डी बी पथकाने तपासचक्रे फिरवुन 21 ऑगस्टला केसुर्लि जंगल शिवारातूण MH 34 AV 0315 या चारचाकी वाहनामध्ये भरुन असलेले लोखंडी गज तसेच 25 ऑगस्टला चार नग तिसफुटी टीनपत्रे, 15 नग प्लास्टीक खुर्च्या, जुनी ग्यास शेगडी व गुन्ह्यात वापरलेले बोलेरो पिकअप वाहन MH 34 BG 2884 असा एकुण 11 लाख 40 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नऊ आरोपींना अटक करन्यात आली आहे. आरोपींमधे प्रशांत संजय वेसरकर (30) रा. सुकनेगाव, राजू मधुकर झिलपे (23) रा. रंगणाथ नगर, सत्यम शेलेंद्र शेलार (22) रा. इस्लामपुरा, रिजवाण शाह जिगर शाह (26) रा. वाढोणा पापड, जि. अमरावती, ह.मू. वनी, शेख शाहरूख शेख सलीम (24) रा. खरबडा मोहल्ला, शंकर भीमराव दारुंडे (19) रा. खरबडा मोहल्ला, मो. रिजवाण मो. हनीफ (25) रा. पंचशील नगर, शाम वासुदेव चोकारे (29) रा. पंचशील नगर यांचा समावेश असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम 379,411,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही एसडीपीओ सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पो.नी. वैभव जाधव, डीबी पथकाचे गोपाल जाधव, सुधिर पांडे, सुनिल खंडागळे, रत्नपाल मोहाडे, हरिंद्र भरती, अमित पोयाम, पंकज उंबरकर यांनी केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......