WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आज सात व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यातील रुग्ण संख्या 159 झाली

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच असून दर दिवशी कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडतांना दिसत आहे. शहरतील कोरोना संक्रमणाची गती अधिक तिव्र झाली असून आज आणखी सात पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 159 झाली आहे. तर ऐक्टिव पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 92 झाली आहे.

शहर व तालुक्यात कोरोनाचा पदुर्भाव चांगलाच वाढतांना दिसत असून कोरोना बाधितांचा आकडा फुगतच चालला आहे. आज 5 तपासणी नमुन्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर दोन रापिड़ अँटीजन चाचणींचे रेपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तिंमध्ये जटाशंकर चौकातील मेडिकल मधिल दोन व्यक्ती, भालर टाऊनशिप येथील दोन, रंगणाथ नगर येथील एक, रंगारीपुरा येथील एक तर सावंगी (नायगाव) येथील एका व्यक्तिचा समावेश आहे. आज एकुण सात व्यक्ती पॉझिटीव्ह असून तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 159 झाली आहे. तर ऐक्टिव पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 92 झाली आहे. प्रशासन योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना करित असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR