WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यातील रासा येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एकाला अटक

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

तालुक्यातील रासा येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी परप्रांतीय आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र कुमार शाहू रा. उत्तर प्रदेश असे या आरोपीचे नाव असून तो विवाहित आहे. आरोपीच्या घराशेजारी राहणारी अल्पवयीन मुलगी आरोपीच्या पत्नीला भेटण्याकरिता गेली असता आरोपीने तिचा विनयभंग केल्याचे मुलीच्या आईने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

रासा येथे काही वर्षाआधी परप्रांतीय कुटुंब कामानिमित्त आलं व याच ठिकाणी स्थायिक झालं. या कुटुंबातील एका मुलीचं कॅट्रेसचा व्यवसाय असलेल्या त्यांच्याच प्रांतातील एका युवकाशी लग्न झाले. या युवकाचा कॅट्रेसचा व्यवसाय असल्याने गावातील काही गरजवंत कुटुंबातील मुली जितेंद्र कुमार शाहू या युवकाकडे रोजंदारीने काम करण्यास परप्रांतात जायच्या. पीडित मुलगीही त्याच्याकडे कामाला असल्याचे समजते. वर्षभरानंतर तीन चार दिवसांआधीच पीडित मुलगी व आरोपी रासा येथे आले असल्याचे समजते. वर्षभर कॅट्रेसच्या व्यवसायात रोजंदार म्हणून कामावर असलेली अल्पवयीन मुलगी तीन चार दिवसांआधीच रासा या आपल्या गावी आली व आरोपीने संधी साधून तिचा विनयभंग केल्याचे हे प्रकरण असून पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३५४ व बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ अन्वये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा परप्रांतात कॅट्रेसचा व्यवसाय असून सदर अल्पवयीन मुलगी, आरोपी व आरोपीची पत्नी एकाच ठिकाणी काम करत असल्याने आरोपी व अल्पवयीन मुलगी तीन चार दिवसांआधीच रासा येथे परतले असून पीडित मुलगी आरोपीच्या पत्नीला भेटण्याकरिता त्याच्या घरी गेली असता त्याने मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार मुलीच्या आईने पोलीस स्टेशनला नोंदविली असून पोलिसांनी तक्रारीवरून जितेंद्र कुमार शाहू या आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास उप पोलीस निरीक्षक निखिल फटिंग व एपीआय माया चांदसे करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले