WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे लैगिक शोषण केल्या प्रकरणी पोलिसांनी शहरातील एका तरुणाला अटक केली असून त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. गजानन नत्थूजी बोधलकर (२८) रा. वणी असे या आरोपी तरुणाचे नाव आहे.

प्रेमसंबंध असलेल्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. मागील सात वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या या तरुणीला लग्नाचे आश्वासन देत तिचे लैंगिक शोषण केले. नंतर लग्नाला नकार दिल्याने तिने गजानन बोधलकर याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दिल्याने पोलिसांनी आरोपी तरुणावर भादंवि च्या ३७६ (२) (N) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास एपीआय माया चाटसे करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले