WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लालगुडा येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच असून जीवन नकोसे झाल्यागत नागरिक आत्महत्या करीत आहेत. खास करून कुटुंबाची आधारवड असलेली युवा पिढी खचलेल्या मानसिकतेतून आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. तालुक्यातील लालगुडा येथील ३२ वर्षीय युवकाने आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. प्रकाश वासुदेव कुडमेथे (३२) असे या या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने घराच्या आड्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची फिर्याद मृतकाचा मोठा भाऊ अर्जुन वासुदेव कुडमेथे (३५) रा. लालगुडा याने पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतक प्रकाश कुडमेथे हा विवाहित असून मागील पंधरा दिवसांपासून त्याची पत्नी माहेरी जाऊन असल्याचे समजते. पुढील तपास पोलीस जमादार विठ्ठल बुर्रेवार करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......