WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पैसे देवाण घेवाणीच्या वादातून एकाने दुसऱ्याचे फोडले डोके

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

पैसे देवाण घेवाणीचा वाद विकोपाला जाऊन झालेल्या मारहाणीत एकाने दुसऱ्याला दगडाने मारून डोके फोडल्याची घटना शहरातील आंबेडकर चौकात काल रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. अनंता तुकाराम ढेरे (५२) रा. एस.पी.एम. हायस्कुल जवळ या इसमाला आरोपी नरेंद्र आत्माराम कांबळे (३५) रा. राजीव गांधी चौक याने डोक्याच्या मागच्या बाजूस दगडाने मारून जख्मी केले. याबाबत जख्मी इसमाचा मुलगा विनोद अनंता ढेरे (३२) याने पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी व जख्मी यांच्यात १२ ऑक्टोबरला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास उसनवारीच्या पैशातून वाद झाला. त्यानंतर आरोपी घरी निघून गेला व अनंता ढेरे हा नेहमी प्रमाणे रात्री ८ वाजता आपल्या आंबेडकर चौकातील बूट पॉलिशच्या दुकानात झोपण्याकरिता गेला. नरेंद्र कांबळे याने मध्यरात्री अचानक जख्मीचे दुकान गाठत त्याच्या डोक्यावर दगडाने मारून जख्मी केले. सकाळी उशीरा पर्यंत वडील घरी न परतल्याने मुलाने सकाळी ७.३० वाजता दुकानावर जाऊन पहिले असता वडील जमिनीवर पडून दिसले. तसेच त्यांच्या डोक्याला रक्त लागले होते. लगेच त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व त्यांनी सांगितलेल्या घटनाक्रमानुसार मुलाने १३ ऑक्टोबरला दुपारी ४.४५ वाजता पोलीस स्टेशला नरेंद्र आत्माराम कांबळे (३५) याच्या विरुद्ध पोलीस तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादंवि च्या कलम ३२४ नुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.