WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात आढळले आज कोरोनाचे चार रुग्ण

Image

corona update ४ Nov.

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शहर व तालुक्यातील कोरोना संक्रमणाची गती मंदावली असून आज तालुक्यात कोरोनाचे चार रुग्ण आढळून आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७९२ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची रुग्णांची संख्या ३७ झाली आहे.

तालुक्यातील २७ नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून ३ पॉझिटिव्ह तर २४ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज २२ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या असून एक व्यक्ती पॉझिटिव्ह तर २१ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकूण ५८४६ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज आणखी १८ व्यक्तींचे नमुने तपासणी करीता पाठविण्यात आल्याने ४१ नमुन्याचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. तालुक्यातील चार व्यक्तींना आज कोरोनाची लागण झाल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७९२ झाली असून ७५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. पॉझिटिव्ह व्यक्तींपैकी १७ व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये, ९ व्यक्ती कोविड केयर सेंटरमध्ये तर ९ व्यक्ती यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये उकणी येथील एक, रवी नगर एक, सर्वोदय चौक एक तर आदर्श शाळेजवळील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले