WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यातील आणखी नऊ व्यक्तींचे अहवाल आले पॉझिटिव्ह !

Image

corona update ६ Nov.

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यात आज आणखी नऊ कोरोना रुग्णांची भर पडल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८०७ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. आज आणखी दोन रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ७५७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

कोरोनाची प्रसारण क्षमता कमी झाल्याने दैनंदिन रुग्णवाढही नियंत्रणात आली आहे. प्रतिदिन मोठ्या संख्येने आढळणारे रुग्ण आता कमी झाले आहेत. आज आठ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून दोन पॉझिटिव्ह तर सहा नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज करण्यात आलेल्या ३६ रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये ७ व्यक्ती पॉझिटिव्ह तर २९ व्यक्ती निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी २४ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ४८ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. आज नऊ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८०७ झाली असून ७५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, २२ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर ५ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये पुनवट येथील एक, सुकणेगाव एक, पळसोनी एक, काळे ले-आऊट एक, सिंधी कॉलनी एक, रंगनाथ नगर एक, देशमुखवाडी एक, विठ्ठलवाडी येथील एक तर शहरातील आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......