WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी संपन्न

Image

Image वणी- येथील जिल्हा परिषद माध्यमिक उर्दू उच्च माध्यमिक विद्यालयात दोन दिवसीय तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी सोहळा संपन्न झाला. वणी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन मा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सौ लिशाताई विधाते ह्या होत्या. प्रमुख अतिथी जी प सदस्या मंगलाताई पावडे ,गटविकास अधिकारी राजेश गायनर, प्रा महादेवराव खाडे, रवी बेलूरकर, मुख्याध्यापक संतोष धावडे,हे उपस्थित होते. Image या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष धावडे यांनी केले. विचार व्यक्त करताना प्रा महादेवराव खाडे यांनी प्रयोगातून विज्ञान या विषयावर उत्कृष्ट व्याख्यान प्रस्तुत केले .सूत्रसंचालन मुजफ्फर अली खान सर यांनी केले तर आभार आर बी राऊत यांनी मानले .यावेळी वणी तालुक्यातील 75 शाळांनी विज्ञान प्रदर्शनीत सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख लक्ष्मण इदे, नागतुरे सर, राजेंद्र कोरडे सर, देवतळे सर, गौरकार मॅडम नासरे सर, व शिक्षक शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले