WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कविसंमेलनाने वर्धापन दिन साजरा

Image

सुरज चाटे वणी:- येथील विदर्भ साहित्य संघ शाखा वणीच्या वतीने शाखेचा 65 वा वर्धापन दिन स्थानिक कवींचे कवि संमेलन घेऊन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा. दिलीप अलोणे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय कार्यकारिणी सदस्य माधव सरपटवार उपस्थित होते.

Image

वणी शाखेची स्थापना 15 जानेवारी 1954 रोजी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक म. ता. राजूरकर यांच्या पुढाकाराने झाली. तेव्हापासून सातत्याने ही शाखा सक्रिय राहिलेली आहे. या शाखेला 2017 चा उत्कृष्ट शाखेचा पुरस्कार मिळाला आहे. मागील वर्षी या शाखेने जिल्हा व विदर्भ साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले होते. विविध विषयावर व्याख्यान, परिसंवाद, कवि संमेलन इत्यादी उपक्रमाद्वारे साहित्य चळवळ राबविली जाते. Image वर्धापन दिनानिमित्त आयोजित कवि संमेलनात येथील 18 कवींनी आपापल्या कविता सादर केल्या. त्यात सुहास लुथडे, डॉ. विकास जुनगरी, मीनाक्षी किलावत, शंकर घुगरे, मनोज बतरा, प्रा. नीता खामनकर, राकेश दिकोंडावार, रजनी पोयाम, अशोक आकुलकर, प्रीती दरेकर, प्रवीण सातपुते, सुप्रिया केदार, सरोज भंडारी, सागर बरशेट्टीवार, स्वप्ना पावडे, माधव सरपटवार, राजेश महाकुलकार, प्रा. दिलीप अलोणे यांनी एकापेक्षा एक सरस कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखेचे उपाध्यक्ष गजानन कासावार यांनी केले. सूत्रसंचालन स्थानिक शाखेचे सहसचिव राजेश महाकुलकर यांनी केले. आभार प्रदर्शन सचिव अभिजित अणे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी नगर वाचनालयाचे देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार यांनी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.