WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा नविन संकल्प.

Image

दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत .

यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रहार विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख तथा धनगर युवा मोर्चाचे संस्थापक मा. अनिकेत चामाटे यांनी केले आहे.प्रहार विद्यार्थी संघटना वणी तालुक्याच्या वतीने आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त नांदेपेरा रोड वणी येथे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी प्रहार विद्यार्थी संघटनेचे उपतालुका प्रमुख मा.साई नालमवार, तालुका सरचिटणीस मा.भीमा खोब्रागडे ,शहर संघटक, मा.गणेश देवाळकर,तालुका संपर्क प्रमुख मा.वृषभ तुराणकर,मा.गौरव ताटकोंडवार (प्रहार सेवक) व प्रहारचे इतर कार्यकर्ते व परिसरातील नागरिक हजर होते.

🌍 _*वणी एरियातील न्यूज, जॉब्स, माहिती तुमच्या WhatsApp वर अगदी मोफत , त्यासाठी क्लिक करा*_ 👉 https://chat.whatsapp.com/BSANBJhJwaCCZAUglE2U3F

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले